रवी इंडस्ट्रीजच्या सोयाबीन तेलाचा ४ लाखांचा साठा जप्त : एफडीएचा दणका
पतंजलि
गाय का घी गाय के दूध से निर्मित घी
FG CODE: 180031035 450 ml
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता
ब्युरो): राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाईचा जोरदार बडगा उचलला आहे. अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मे. रवी ऑइल इंडस्ट्रीज आणि पतंजली आयुर्वेद सुपर डिस्ट्रीब्युटरवर एफडीएच्या पथकाने थेट धडक कारवाई केली आहे. या धडक मोहिमेमुळे भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रवी ऑइल इंडस्ट्रीजवर कारवाई करून २ हजार ७१० किलो रिफाईंड सोयाबीन ऑईलचा साठा जप्त केला. ज्याची किंमत ४ लाख ८७ हजार एवढी आहे. मे. रवी ऑइल इंडस्ट्रीज ऑईल रिपॅकिंग युनिटचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. लासूर स्टेशन येथील मे. रवी ऑइल इंडस्ट्रीज या तेल उत्पादक आस्थापनेचा एफएसएसएआय अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद
पतंजली आयुर्वेद डिस्ट्रीबुटरवर कारवाई
▶ सुंदरवाडी येथील गोदामातून भेसळयुक्त किंवा चुकीचा ब्रँड असल्याच्या संशयावरून २० लाख २० हजार १९० रुपयांचे पतंजली गायीचे तूप जप्त करण्यात आले. ही कारवाई सुंदरवाडी येथील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या दिव्य महावितरकावर करण्यात आली. विक्रीसाठी ठेवलेला साठा संशयास्पद आढळल्याने अन्न सुरक्षितता आणि मानके कायद्याच्या कलम अंतर्गत जप्त करून सुरक्षित ताब्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहील, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
सुरसे यांनी पेढीची आकस्मिक तपासणी केली होती.
तपासणीत ८६ गुणांपैकी या उद्योगाला केवळ ३० गुण मिळाले असून, तिथे अन्न सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. खाद्यपदार्थ आणि पाण्याचे आवश्यक प्रयोगशाळा चाचणी अहवाल उपलब्ध नव्हते. तसेच पॅकिंग साहित्याचे खाद्यसंपर्क अनुरूपता प्रमाणपत्र नव्हते, कामाच्या ठिकाणी पुरेसे वायुवीजन नसणे, खिडक्यांना कीटकप्रतिबंधक
जाळ्या नसणे आणि कर्मचाऱ्यांना ऍप्रन, ग्लोव्हज व हेडकॅप यांसारखे संरक्षणात्मक कपडे न पुरवणे अशा त्रुटी आढळल्या. सहायक आयुक्त (अन्न) तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी निलंबनाचा आदेश जारी केला. सर्व त्रुटींचे योग्य अनुपालन करून त्याचे पुरावे सादर केल्याशिवाय आणि प्रशासनाच्या फेरतपासणीशिवाय हे निलंबन उठवले जाणार नाही, असे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















